पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी (जिल्हा वार्षिक आणि राज्यस्तरीय) AH-MAHABMS ही आज्ञावली विकसित करण्यात आलेली आहे. पशुपालकांना या आज्ञावलीचा उपयोग करून पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या ७ विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. योजनेची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत मोबाईल ऍपवर उपलब्ध आहे. या प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:च्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.
Read more
Advertisement
Advertisement